बदलापूर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
शहरात रत्नागिरी व सिंधुदुर्ग रहिवाशांसाठी कार्यरत असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाने श्री हनुमान मारुती देवस्थान आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाद्वारे उत्साहात पालखी नाचविण्यात आली.महिलांनीही विठु नामाच्या गजरात पालखी नाचविण्याचा आनंद घेतला.कोकणातील संस्कृतीचे प्रतिक म्हणून पालखी नृत्य करण्याच्या या सादरीकरणाचे उपस्थितांकडुन व रस्त्यात भेटणा-या सर्व प्रेक्षकांकडुन कौतुक करण्यात आले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी,सदस्य,महिला कार्यकर्त्या तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग बदलापुरकरवासिय या शोभा यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.