पंढरपूर प्रतिनिधी
लायन्स क्लब पंढरपूर या मूळ लायन्स क्लबने लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम हा नूतन क्लब स्पॉन्सर केला आहे.या स्पेशालिटी क्लबमधील सदस्यांचा नुकताच शपथविधी झाला.क्लब अध्यक्ष ला.ललिता कोळवले ,क्लब सचिव ला.डॉ.अमित इनामदार,क्लब खजिनदार ला.शिवानंद वसेकर,प्रथम उपाध्यक्ष ला.अजित यलमार कंडरे तर द्वितीय उपाध्यक्ष ला.डॉ.मंदार सोनवणे यांची निवड झाली आहे.
लायन्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष ला.विवेक परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रास्ताविक नूतन अध्यक्ष ला.ललिता कोळवले जाधव यांनी केले.शपथविधीसाठी लायन्स 3234 D1 चे द्वितीय उपप्रांतपाल MJF Adv .ला.मल्लिनाथजी पाटील उपस्थित होते.त्यांनी सर्व नूतन सदस्यांना शपथ दिली.
नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाला त्यांच्या कार्याची माहिती अतिशय खुमासदार शैलीत देऊन त्यांचे पद्ग्रहण PMJF ला.जगदिशजी पुरोहित डिस्ट्रिक्ट स्पेशालिटी क्लब को- ऑर्डीनेटर यांनी करवले.
नूतन क्लबची अधिकृत स्थापना झाल्याचे चार्टर(सनद)डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF ला.राजशेखरजी कापसे यांनी क्लब अध्यक्ष व पदाधिकारी यांचे कडे सोपवले.
अध्यक्ष सचिव खजिनदार व सर्व संचालक मंडळाला मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व क्लबचे सुंदर रीतीने उद्घाटन केले.त्यानंतर क्लबमधील काही जुन्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना आणखी विधायक कार्यासाठी मार्गदर्शन केले.सामाजिक संस्था या निरपेक्ष बुद्धीने कार्य करून समाजासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रकल्प तयार करून देत असतात.अशा कामासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या लोकांना माझा सदैव पाठींबा असेल असे भरघोस आश्वासन दिले.आमदार परिचारक हे सदैव सामाजिक संस्थाना सहकार्य करत आले आहेत.आणि यापुढेही त्यांचं नक्कीच सहकार्य राहील असा ठाम विश्वास वाटतो असे मत सर्वांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रांतातून अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रांताच्या प्रथम महिला ला.वैशालीजी कापसे,उपविभागीय सभापती ला.गोविंदजी मंत्री,वूमन एमपॉवरमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन MJF ला.निलमजी पाटील तसेच क्लबच्या मार्गदर्शक लायन ला.डॉ.सुजाताजी गुंडेवार,फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.विजयकुमार लोंढे पाटील, GLT चेअरमन ला.डॉ.वीरेंद्रजी चिखले सपत्नीक त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.
सोलापूर,बार्शी,सिधुदुर्ग,रत्नागिरी,सातारा जिल्ह्यातून शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.अर्बन बँक पंढरपूरचे संचालक मा.शांतारामजी कुलकर्णी सर ,श्री.उदयजी उत्पात श्री.अविनाशजी नलबिलवार,सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य मा.कैलासजी करंडे ,इनरव्हील क्लब पंढरपूरच्या संस्थापिका मा.नगिनाजी बोहरी ,अध्यक्षा सौ.वैशालीजी काशिद द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही एम कुलकर्णी सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
ला.कृता सावंत,ला.सुरेखा कुलकर्णी,ला.प्रतिक्षा येलपले,सुजाता लोकरे,वैशाली होटे,वर्षा कोळवले, ला.श्रद्धा बहिरवाडे,ला.वर्षा चंकेश्वरा,ला.सीमा नलबिलवार,ला.डॉ. स्नेहल मोहिते,ला.अलिशा कंडरे,ला.डॉ.रेखा मोहिते,ला.स्मिता अधटराव,ला.राणी विभूते ला.योगिता वसेकर,ला.शार्दूल नलबिलवार,ला.प्रतिक मोहिते ला.डॉ.सूरज तंटक,ला.गणेश पाटील,ला.तानाजी सालविठ्ठल,ला.डॉ.किरण बहिरवाडे, हे सर्व लायन्स पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.माया कुलकर्णी उत्पात यांनी केले तर आभार ला.शिवलिंग वसेकर यांनी मानले.