पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज अंतर्गत बी.सी.ए.आणि बी.एस्सी.(ईसीएस) च्या विद्यार्थ्यांनी गोपाळपूर या गावी भेट देऊन स्वच्छता अभियान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण मंदिर, संत जनाबाई मंदिर तसेच ग्रामपंचायतच्या आसपासचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता संस्कार शिबिर अभ्यासाचा एक भाग म्हणून स्वच्छता अभियान शिबिर संपन्न केले.यामध्ये महाविद्यालयाच्या एकूण ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
अशी माहिती कॉलेजच्या कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. हे स्वच्छता अभियान शिबिर यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल गोपाळपूर गावचे सरपंच विलास मस्के, उपसरपंच उदय पवार,समाजसेविका दुर्गा माने, मा.सरपंच.शिवाजी आसबे गावचे नागरिक, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख मुकुंद चौगुले, शिक्षक सचिन निकम,संपत लवटे,क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एस.भोईटे,संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी गोपाळपूर गावचे सरपंच उपसरपंच,नागरिक यांचे स्वच्छता अभियान शिबिर संपन्न करून घेतल्याबद्दल अभिनंदन केले.