जागतिक श्रवण दिनानिमित्त उपक्रम
नाशिक प्रतिनिधी
जेथे कमी तेथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे नुकताच मखमलाबाद गावातील सह्याद्री शिक्षण प्रसारक समाज विकास मंडळ नाशिक संचलित जागृती श्रवण विकास विद्यालयास श्रवण दिनानिमित्त मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नमस्ते नाशिक फौंडेशनच्या अध्यक्ष सौ स्नेहल देव, ऍडव्होकेट उज्ज्वला पाटील, सुवर्ना सायंकर , शामकांत भोंगे , रिदम देव,संदीप देव शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शाळेला कडधान्य तसेच किराणा साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे यांनी १९९८ पासून मखमलाबाद येथे शाळा कार्यरत असून सध्या शाळेत ८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नमस्ते नाशिक फौंडेशन संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीसाठी आवाज दिला जातो तेव्हा तात्काळ आम्हाला मदत उपलब्ध होते असे वाघमोडे सर म्हणाले.