पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक पुणे येथे आज पार पडली.
या बैठकीचे आयोजन सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केले होते. या बैठकीला अठरापगड जातीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी वेगवेगळ्या समाजातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्न पवार साहेबांनी ऐकून घेतले. त्यानंतर या समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी एक उपसमिती तयार करण्याची सूचना पवार साहेबांनी केली.
या वेगवेगळ्या समाजाच्या समस्यांबाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन शरद पवार साहेबांनी उपस्थितांना दिले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, पंडित कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, मच्छिंद्र भोसले, तुकाराम साळुंखे, गौतम कदम, शैलेंद्र जाधव, रमेश राक्षे, अंकल सोनवणे, अनंत कांबळे, अजय गायकवाड, लक्ष्मण सुरनर, विजय खंडाळे, गोरक्ष लोखंडे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.