माढा प्रतिनिधी
माढा येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय आणि न्यायाधीश निवासस्थानासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.अशी माहिती आ.रणजित सिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.
माढा येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी १९ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात माढा, केज, अहेरी या न्यायालयासाठी एकूण २ कोटी ७० लाख निधी तरतूद करण्यात आली आहे.
तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांचानिधी उपलब्ध झाल्याने या कामाला वेग येईल. या दोन्ही कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी माढा वरिष्ठ दिवाणी न्यायालय आणि न्यायाधीश निवासस्थान या दोन्ही कामांना मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद..! माढा वकील संघाने याकामी मी पुढाकार घेऊन हे दोन्ही प्रश्न मार्गी लावले यासाठी माझे आभार मानले आहेत. आपल्या भागासाठी अधिकाधिक विकासकामे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. असे ही मोहिते पाटील यांनी सांगितले.