मोहोळ प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १५ मार्च ते १९ मार्च २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील. दिनांक १५ मार्च २०२३ ते १९ मार्च २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस ते ३७ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ५९ ते ८१ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ३१ ते ५६ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्यााचा वेग ताशी १२ किमी ते १६ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे.
ईशारा: सोलापूर जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ मार्च ते १८ मार्च २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह ( वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर यांनी दिली आहे.