कामगारांच्या मागण्याबाबत नंतर बैठक घेणार :- सहाय्यक कामगार आयुक्त
सोलापूर प्रतिनिधी
ठाकूर सावदेकर बिडी कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्याबाबत दिनांक 11 मार्च 2023 पासून स्टाफ कर्मचाऱ्यांनी संप पुकरल्यामुळे पाच दिवस कारखाने बंद होते. त्यामुळे हजारो महिला बिडी याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त साहेब यांनी कामगार संघटना, व्यवस्थापक व विडी कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन कारखाने चालु करण्याचा तोडगा काढला त्यास तिन्ही पक्षाच्या लोकांनी मान्यता दिल्याने ५ दिवसापासून बंद असलेले ठाकुर सावदेकर विडी कंपनी आजपासून पूर्ववत चालू झाले आहेत.
ठाकूर सावदेकर बिडी कंपनीतील स्टाफ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत व्यवस्थापक गेल्या वर्षभरापासून दुर्लक्ष करीत असल्याने कारखाने आणि व्यवस्थापन स्टाफ कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावर येऊ नका असे तोंडी सूचना दिल्या कारणाने दिनांक 11 मार्चपासून संप पुकारले त्यामुळे महिला बिडी कामगार लेबर व पॅकर कामगार व इतर सुमारे अंदाजे २००० कामगार बेकार झाले होते. याबाबत महाराष्ट्र कामगार सेना, नवा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, मनसे कामगार संघटना यांचे नेते विष्णू कारमपुरी (महाराज) सायबांना तेगगेली, श्रीधर गुडेली, यांनी एकत्रितपणे बिडी कामगार बचाव कृती समितीद्वारे विविध आंदोलन केले. व सहाय्यक कामगार आयुक्त यांना समितीकडून निवेदन ही निवेदन देण्यात आले. याची दखल घेऊन दिनांक 15 मार्च 2023 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त, विडी कामगार बचाव कृती समिती, ठाकूर कारखाना व्यवस्थापन व महिला बिडी कामगार यांची संयुक्त बैठक सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृती समितीच्या नेत्यांनी व कामगारांनी कारखाने चालु करण्याबाबत भक्कम भूमिका मांडली कृती समिती, कामगार आणि व्यवस्थापनाचे बाजू ऐकून घेऊन सहाय्यक कामगार आयुक्तांनी ताबडतोब कारखाने चालु करण्याचे आदेश दिला ज्या समस्या आहेत. त्या नंतर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. बैठकीत कारखाने चालु करण्याचा निर्णय सहाय्यक कामगार आयुक्तांनी बैठकीसाठी आलेल्या शेकडो महिला विडी कामगारांना सांगितले तेव्हा विडी कामगारांनी बंधू - भगिनींनी कामगार एकजुटीचा विजय असो, सहाय्यक कामगार आयुक्त जिंदाबाद अशा घोषणा देऊन एकच जल्लोष केला.
सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगार बचाव कृती समितीचे - विष्णु कारमपुरी (महाराज), सायबांना तेगगेली, श्रीधर गुडेली, मालक प्रतिनिधी मनुरे (मामा), महेश कुंभार, सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेब श्री पठाण साहेब कामगार प्रतिनिधी आंबंन्ना कोळी, बाबनगरे, रेखा आडकि, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख आणि विडी कामगार बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.