पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित पंढरपूर येथील चालू असलेल्या शाहिरी प्रशिक्षण शिबिरात शिबिरार्थी विद्यार्थ्यांना आज दिनांक 16 मार्च रोजी शाहीर गोरे यांच्या जिव्हाळ्याचे मित्र साई समर्थ इंजिनिअरिंगचे मालक बाळासाहेब जयसिंग पोळ राहणार घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचे चिरंजीव मयूर बाळासाहेब पोळ यांची कन्या कुमारी माही मयूर पोळ हिच्या वाढदिवसानिमित्त शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
शिबिरातील विद्यार्थिनी विद्यार्थी कलावंतांनी हॅपी बर्थडे टू यू असे गीत गाऊन कुमारी महिला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बाळासाहेब पोळ यांनी विद्यार्थी कलावंतांना चांगलं प्रशिक्षण मिळो व कलावंतांची वाटचाल शाहिरी क्षेत्रात वाढत राहो महाराष्ट्राची शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन होवो प्रशिक्षणातून शाहीर विद्यार्थी चांगले घडावेत व शाहिरी परंपरा विद्यार्थ्यांनी तेवत ठेवावी अशा शुभेच्छा दिल्या शाहीर गोरे यांनी बाळासाहेब पोळ यांचे आभार मानले.