शेळवे प्रतिनिधी
दि.२० मार्च रोजी शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल मध्ये जल्लोष २०२२-२३ हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक आमर धनंजय पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून चिरायू हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. निरज शहा, सुप्रसिद्ध फोटोग्राफर बशीरभाई शेख, सुप्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब देशमुख,आदर्श विध्यामंदिर शेवते चे संस्थापक अध्यक्ष मारुती तोंडले तसेच सामाजिक, राजकीय शिक्षण कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,शेळवे- खेड भाळवणी गावचे सरपंच-उपसरपंच उपस्थित होते,ग्रामपंचायत सदस्य विध्यार्थी पालक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्ज्वलन करून पुरस्कार वितरण-बक्षिस वितरण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष एस टी गाजरे सर यांनी प्रास्ताविकात प्रशालेची प्रगती,भविष्यातील नियोजन या विषयी सांगितले,डॉ .बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या सोई सुविधांसाठी भरगोस योगदान देण्याचे आश्वासन दिले तसेच बशीरभाई शेख यांनी प्रशालेचे संस्थापक, शिक्षक, विध्यार्थी आणि पालक यांचे कौतुक केले, डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक आमर साहेब पाटील यांनी सणराईज प्रशाला आणि विठ्ठल परिवाराचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील साहेब यांच्यातील भावनिक बंध स्पष्ट केले व प्रशालेसाठी कोणतीही मदत करण्याची तयारी दर्शिवली.
कार्यक्रमाच्या औचित्याने सनराईज बेस्ट पॅरेन्ट्स ऑफ दि इयर, बेस्ट टीचर,बेस्ट स्टुडेंट ई पुरस्कार देण्यात आले तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान करण्यात आले, त्यानंतर सुश्राव्य, नेत्रदीपक असा विध्यार्थ्यांच्या गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे ,संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे, सर्व सहशिक्षक, कर्मचारी यांनी भरपूर परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास पंढरपूर पंचक्रोशीतील बहुसंख्य लोक उपस्थित होते, दि.२१ मार्च सायंकाळी ठिक ७:०० वा. असाच बहारदार कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांगून कार्यक्रमास पूर्णविराम देण्यात आला.