पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयाच्या बी.सी.ए व बी.एस्सी (ईसीएस) भाग - २ व ३ मधील विद्यार्थ्यांनी प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्था पंढरपूर संचलित, नवजीवन निवासी अपंग शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाजवळ, पंढरपूर या अपंग बालकांच्या शाळेमध्ये भेट देऊन सदर शाळेमधील अपंग बालकांना महाविद्यालयातर्फे शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले व प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे यांनी दिली.
तसेच अपंग शाळेच्या माध्यमातून अपंग मुला मुलींच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अशावेळी दानशूर दात्यांच्या सहकार्याने अडचणीवर मात करणे सोपे जाते व सामाजिक कार्यात सहभागाचे समाधानही लाभते असा विश्वास महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. मुकुंद चौगुले यांनी व्यक्त केला व या सामाजिक कार्यामध्ये महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षक प्रा.अस्मिता घोलप यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयामधून अपंग बालकांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल, उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.