सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज संस्थेचे जेष्ठ संचालक व पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दिलीप आप्पा घाडगे यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त मा.दिलीप आप्पा घाडगे मित्र मंडळ यांचे वतीने मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना लाडू चिवडा खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य अशोक बनसोडे, पर्यवेक्षक रणजीत शिनगारे तसेच माजी सरपंच बाळासाहेब लोकरे,दिलीप चव्हाण, संभाजी चव्हाण, पत्रकार चंद्रकांत माने, कैलास चव्हाण,विलास दराडे,सुरेश कट्टे,धनंजय भाजीभाकरे,राजेंद्र जाधव,महेश देशमुख, जैनुद्दीन शेख,देवदत्त वाघ,नितीन वायदंडे, श्रीकांत चंदनशिवे,प्रथमेश गावडे,नवनाथ लोणकर, गणेश खिलारे,बबन कोकतरे,गणेश पाटील, सविता इंगळे,प्रतिभा जावीर,सरस्वती शिंदे,अंजली कापसे,धनाजी देठे,विष्णूपंत घोगले, समाधान शेजाळ,संदीप चौधरी,राजाराम घोडके, विजय पंडीत, रोहीत हेंबाडे,राजकुमार ढगे,किरण बोधले,सुजीत मोरे,सुभाष देवकर,संजय निंबाळकर,बबन पवार,बाळू बनसोडे आदी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.