पिलिव प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील साळमुख येथे धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जखमी अवस्थेत बसलेला होता.गावातील पोलिस पाटील व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्या व्यक्तीची विचारपूस केली असता तो धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजूर असल्याचे समजले.
त्यावेळी " दि . ०३/०३/२०२३ ते दि . १७/०३/२०२३ या कालावधीत पोलीस अधिक्षक अप्पर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज यांनी हरविलेले व्यक्तींचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून आदेश दिले होते . दि . १६/०३/२०२३ रोजी साळमुख चौक , मळोली ता . माळशिरस येथे एक पिचलेला इसम त्याचे पायास झालेले जखमामुळे , वेदनेमुळे विवव्हत असले बाबत वेळापुर पोलीस स्टेशनचे सहा . पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे पोलीस हवालदार मच्छिंद्र राजगे डॉ . जाधव मळोली यांचे कडुन समजले नंतर सहा . पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांचे मार्गदर्शना प्रमाणे त्यांनी तात्काळ साळमुखचे पोलीस पाटील प्रशांत मदने यांना फोनद्वारे संपर्क साधुन त्यांनी तसेच ग्रामसुरक्षा दलाचे विजय सुळ , प्रदिप मदने , चंद्रकांत महाडीक यांची मदत घेवुन सदर इसमाकडे चौकशी करून त्यास खाण्यास दिले .
त्याचेकडे आस्थेने चौकशी केली असता त्याने “ तुलशा ढापच्या पाडा शिरपुर , " ऐवढेच सांगत होता . त्यास कांहीही जास्त सांगत येत नव्हते , बोलता येत नव्हते . अशा परिस्थतीत त्याची ओळख पटविणे व त्याचेवर उपचार होणे आवश्यक होते म्हणुन तात्काळ सदर इसमास १०८ अॅम्ब्युलन्स मधुन उपचारास अकलुज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले .
त्यानंतर सहा . पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे यांनी “ तुलशा ढापच्या पाडा शिरपुर " ऐवढयात त्रोटक माहिती वरून शिरपुर जि . धुळे येथील पोलीसांशी तसेच ढावच्या पाडा येथील ग्रामपंचायत सदस्य पावरा यांचेशी संपर्क साधुन त्यांना फोटो पाठवुन सदर इसमाची ओळख पटविली असता त्याचे नाव शब्बीर तुलशा पावरा वय ४० वर्षे रा . ढावच्या पाडा ता . शिरपुर जि . धुळे असे असल्याचे निष्पन्न झाले . नमुद इसम हा उस तोडी करिता सांगली येथे आलेला होता .
तेथुन गेले चार पाच महिन्यापासुन बेपत्ता झालेला होता . सदर जखमी इसमास उपचारास सिव्हिल हॉस्पीटल सोलापुर येथे पाठविले असुन त्याचे वडील तुलशा परशा पावरा , भाउ नामदेव तुलशा पावरा असे नेणे करता निघालेले आहेत . सदर इसमाचे वडीलांनी हरविलेले इसमाचा फोटो पहाताच त्यांना रडु कोसळले कारण त्यांनी सदर इसमाचा खुप शोध घेतला परंतु तो मिळुन आलेला नव्हता .