स्व. आम. डॉक्टर भाई गणपतराव देशमुख विचार मंचाच्या वतीने न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
सांगोला प्रतिनिधी
प्रत्येक महिला स्वतःच्या संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलाबाळांची काळजी घेणेसाठी आणि वडील धाऱ्यांची सेवा करणेसाठी सातत्याने झटत असते. महिला गृहिणी असो, नौकरदार असो वा व्यावसायिक असो तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्य पार पाडावेत लागतात. सुशिक्षित असो वा अशिक्षित, गरीब घरातील असो वा श्रीमंत महिलांना त्यांची दैनंदिन कर्तव्य, घरकामे, घरातील रुग्णांची सुश्रुषा चुकत नाही.
घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचे टाइम्स टेबलं सांभाळताना त्यांनी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. स्वतःची तब्बेत, खाणे पिणे, हिंडणे फिरणे, मैत्रिणी ना भेटणे, स्वतःचे छंद कला जोपासणे, पुरेसा आराम करणे, पथ्य पाणी जपणे याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. या सर्व दैनंदिन व्यापातून महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ भेटत नाही पुरुषाप्रमाणे महिलांमध्ये सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्याने काम करण्याची क्षमता असते परंतु त्यांना संधी भेटताना दिसत नाही त्यामुळे स्वर्गीय आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख विचार मंच यांच्या वतीने महिला दिनानिमित्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन डॉ. निकिताताई देशमुख यांच्याकडून करण्यात आले.
स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतरावजी देशमुख विचार मंच यांच्या वतीने महिला दिनानिमित्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमादरम्यान गुरुवार दिनांक 16 मार्च रोजी न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड सांगोला येथे बोलत होत्या.
कार्यक्रमा वेळी श्रीमती रतनबाई गणपतरावजी देशमुख, डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ राजश्री पाटील, सीईओ डॉ.सौ राजलक्ष्मी गायकवाड, चेअरमन विमलताई कुमटेकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष राणीताई माने ,संचालिका उषाताई लोखंडे, इनरव्हील क्लब अध्यक्ष उमाताई उंटवाले ,मा नगरसेविका छायाताई मेटकरी ,माणदेशी फाउंडेशन मनीषाताई मोरे, मा नगरसेविका शोभाताई फुले, मा नगरसेविका वैशालीताई झपके, मा नगराध्यक्ष शकुंतला ताई केदार, पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, मा नगरसेविका संजीवनी ताई शिंगाडे ,संचालिका शारदाताई मस्के ,संचालिका वृषालीताई गवळी, मा सभापती राणीताई कोळवले, मा नगराध्यक्ष छायाताई पाटील, संचालिका उषाताई देशमुख, संचालिका राजश्रीताई जाधव ,सह्याद्री स्कूलच्या सुवर्णाताई इंगवले, सौ आशा सलगर, सौ सुनीताताई माळी ,सौ अर्चनाताई बंडगर, सौ सुवर्णाताई सुरवसे ,सौ नीताताई ढोबळे ,सौ विद्याताई जाधव, माधुरी पवार ,दिपाली केदार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना डॉ.निकिताताई देशमुख म्हणाल्या, या कार्यक्रमांमध्ये सौभाग्यवती तथा विधवा महिला, वीर पत्नी महिला, माजी सैनिक पत्नी यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.या आमंत्रणाचा मान राखून त्या महिलांनी यामध्ये विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. हे खास करून या कार्यक्रमाचे नाविन्य आहे.
सीईओ सौ राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या, सध्याच्या धावपळीच्या आधुनिक युगामध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये उच्च संधी भेटताना दिसत नाही. म्हणजे घरामध्ये तशा पद्धतीने वातावरण निर्मिती नसते परंतु आज स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतरावजी देशमुख विचार मंचाच्या वतीने महिला दिनानिमित्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमानिमित्त पाच हजाराहून जास्त महिला या ठिकाणी सहभागी होऊन उपस्थिती दर्शवणे ही खूप मोठी बाब आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सौ राजश्री पाटील म्हणाल्या ,महिलांचे हजारोच्या संख्येने एकत्र जमणे ही खूप मोठी बाब आहे.आज या कार्यक्रमानिमित्त महिला एकत्र आल्या त्यामुळे त्यांच्या कलागुणांना व दैनंदिन घरगुती विचारापासून ,कामापासून नक्कीच वेगळा श्वास घेताना पाहायला मिळाल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतरावजी देशमुख विचार मंच तसेच न्यू इंग्लिश स्कूल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
सौभाग्यवती तथा विधवा महिला, वीर पत्नी महिला, माजी सैनिक पत्नी यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.या आमंत्रणाचा मान राखून त्या महिलांनी यामध्ये विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. हे खास करून या कार्यक्रमाचे नाविन्य आहे. या कार्यक्रमा दिवशी यांनाही मनसोक्त पणे आपले विचार, आचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळून त्यांनी आपले मनमोकळे केले.असे डॉ.सौ. निकिताताई देशमुख यांनी सांगितले.
न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमांमध्ये स्नेहल सागर शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणी व फ्रिज बक्षीस जिंकले .वनिता सोमनाथ झिंजुर्डे यांनी द्वितीय क्रमांक एलईडी व पैठणी बक्षीस मिळवले. शितल प्रमोद डोईफोडे यांनी तृतीय क्रमांक पटकावून पैठणी व मिक्सर बक्षीस मिळवले. निलम मणेरी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून पैठणी व गॅस शेगडी हे बक्षीस मिळवले तसेच शहजान पठाण यांनी पाचवा क्रमांक पटकावून पैठणी व डिनर सेट असे बक्षीस मिळवले.