शेळवे प्रतिनिधी
दरवर्षी सनराईज परिवाराचा वार्षिक स्नेहसंमेलन,पुरस्कार अन पारितोषिक वितरण समारंभ अगदी दिमाखात होतो मात्र मागील दोन वर्षात कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आपण तो कार्यक्रम घेऊ शकलो नाही,मात्र या वर्षी आपण तो कार्यक्रम अतिशय धडाकेबाज पद्धतीने घेतला,या मध्ये आपण पूर्ण वर्षभराचे विध्यार्थ्यांचे बक्षिस वितरण केले, तसेच आपण विध्यार्थी व विद्यार्थिनी,शिक्षक आणि पालक यांना ही पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला,त्यामध्ये
आदर्श विध्यार्थी व विध्यार्थीनी पुरस्कार
१) प्रतिज्ञा पवार (खेड भाळवणी)
२) यज्ञेश लाडे (होळे)
३) अमित साळुंखे (वाखरी)
४) श्रुती नागटीळक (शेळवे) हे विध्यार्थी मानकरी ठरले..
आदर्श माता व पालक पुरस्काराचे मानकरी
१) अश्विनी शिंदे (पिराची कुरोली)
२) सागर गोडसे (कौठाळी)
३) उमेश पोरे (वाखरी) हे पालक ठरले
आदर्श शिक्षक पुरस्कार
१) सौ. उषा लामकाणे
२) सौ. प्रियंका गाजरे यांनी पटकावला..
तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सनराईज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला,त्यामध्ये
१) प्रशांत माळवदे (तेज न्यूज )
२) अमोल शिंदे (पंढरी भूषण)
३)अविनाश सुर्वे ( महाराष्ट्र न्यूज)
४) संभाजी वाघूले ( सुप्रसिद्ध वार्ताहर)
५) गणेश गायकवाड ( ए बी माझा न्यूज)
६)सुरज कौलगे (प्रभात न्यूज)
दरवर्षी आपण पालकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो या वर्षी आपण पालकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये सनराईज पॅरेन्ट्स ए टीम ने बाजी मारली, त्यांना ही या दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले..
कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या दोन्ही दिवसातील सर्व मान्यवरांचा यथोचित आदर सत्कार व सन्मान करण्याचं भाग्य आपल्या सनराईज परिवाराला मिळाला,
पत्रकारांना भव्यदिव्य आणि दिमाखदार सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले, विध्यार्थ्यांच्या बरोबर पालक, शिक्षक, पत्रकार बंधू व शिक्षण प्रेमी नागरिक यांना ही प्रशालेशी समरस होता यावे,सहभाग घेता यावा हा या मागचा उद्देश असतो, ही परंपरा अशीच चालू राहील यात शंका नाही.
जल्लोष २०२२-२३ हा कार्यक्रम दोन दिवसांचा होता, खूप मोठं नियोजन होतं,थोडासा ताण निश्चितच होता,मात्र सनराईज परिवारातील प्रत्येक घटक अगदी माझ्या घरचा कार्यक्रम आहे, आणि तो मी उत्कृष्टपणे पार पाडणार या भावनेने अथकपणे प्रयत्न करत होता त्यांच्या या झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला, सनराईज परिवाराच्या विनंतीला मान देऊन पंढरपूर पंचक्रोशीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्रपरिवार व हजारो पालकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आपलं सनराईज परिवारावर असलेलं प्रेम पाहून मन भरून आलं; या पुढं ही आपली अशीच साथ सोबत अपेक्षित आहे,आपले आभार मानण्यापेक्षा अखंड परिवाराला आपल्या ऋणात राहणे आवडेल..!!असे मत समाधान गाजरे यांनी व्यक्त केले.