मुंबई प्रतिनिधी
शिवसेना आमदार, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, डॉ मनिषाताई कायंदे यांनी सभागॄहात पंढरपूर कॅरीडोर संदर्भात सभागॄहात लक्षवेधी मांडली होती. त्यावर उपसभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य शिवसेना उपनेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती विकास आराखडा व पंढरपूर प्रस्तापित कॅरीडोर व इतर सोई सुविधा निर्माण करण्या संदर्भात विधान भवन मुंबई येथे नुकतीच बैठक बोलविली होती. त्यानंतर त्यांनी पंढरपूरात भाविकांना आगमी काळात अतिशय सुविधाजनक असेल यावर लक्ष द्यावे अश्या सुचना अधिकाऱ्याना दिल्या आहेत.
पंढरपूर कॅरीडोर संदर्भात सभागॄहात लक्षवेधी मांडल्या बद्दल संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते आ. डॉ. मनीषाताई कायंदे यांचा सत्कार “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी सुनिल उंबरे, सुनिल दिवाण आदि मान्यवर उपस्थित होते.