अकलूज प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णा साहेब यांच्यासोबत अशोक दादा गायकवाड उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव तुकाराम साळुंखे पाटील भाऊसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग यांनी करमाळा तालुका दौरा केला,असून शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सामाजिक न्याय विभागामार्फत फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन पक्ष बळकट करणे कामी हा दौरा करण्यात आला. टेंभुर्णी जेऊर केडगाव येथील गुलाब शेठ जाधव कार्याध्यक्ष जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे यांची निवासस्थानी भेट दिली.
यावेळी महेश कैलास बोराटे कार्याध्यक्ष युवक करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड सचिव तुकाराम साळुंखे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रगतशील बागायतदार कैलास शंकर बोराडे, गंगाधर शिनगारे फ्रुट सप्लायर्स प्रवीण शिनगारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बाबत रस्ता नाही अशा समस्या शेतकरी आणि मानल्या ऊस तुटून गेला पाहिजे तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे वाढती महागाई इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य या पक्षाची ताकद काय आहे ही आपण आपले एकतेतून दाखवून दिली पाहिजे असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अंबादास अण्णा ओरसी यांनी पक्ष कार्यकर्ते समोर विचार मांडले.
यावेळी अशोक दादा गायकवाड तुकाराम साळुंखे पाटील युवक कार्याध्यक्ष महेश बोराडे यांनी विचार व्यक्त केले