भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे विद्या मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन बुधवार दिनांक २२/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५/३० मि.वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी या कार्यक्रमास माजी संचालक दीपक गवळी, माजी संचालक काका म्हेत्रे, माजी सरपंच सुनील भानवसे, माजी उपसरपंच दाऊद शेख,चंद्रभागा शिक्षण मंडळाचे संचालक सुनील पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रवीण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव, उद्योजक शकील काझी, चंद्रभागा शिक्षण मंडळाचे सचिव हनुमंत जमदाडे, कार्यकारी संचालक झुंझार आसबे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक काळे यांनी केले आहे.