चिंचणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील प्रति महाबळेश्वर असलेल्या चिंचणी जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट,उपसरपंच रणजीत लामकाने, तुकाराम कौलगे, ग्राम.सदस्य विकास रामगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर जाधव,पत्रकार प्रशांत माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडील आणि शिक्षक यांचे विचार ऐकले पाहिजेत ते विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वागले पाहिजे विद्यार्थ्यांनी सर्व गुण समावेशक असले पाहिजे तरच स्पर्धेच्या युगात तो विद्यार्थी टिकू शकेल.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा, बूम बूम, शेतकरी गीत, अशा हिंदी, मराठी गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले.तर अध्यक्ष निवड शशिकांत सावंत यांनी केली , अनुमोदन शिक्षक जालिंदर गायकवाड यांनी दिले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान काळे व प्रसिध्द कोरिओग्राफर एन. पी. सर यांनी केले.तर आभार मुख्याध्यापिका ललिता मोरे यांनी मानले. यावेळी परिसरातील विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.