ग्रामपंचायतच्या थकबाकी वसुलीसाठी महिला घेणार पुढाकार
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील महिलांची ग्रामसभा जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच राजकुमार पाटील होते. यावेळी मा. पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे,ग्रामपंचायत उपसरपंच सविता लोखंडे,ग्राम.सदस्य रणजीत जाधव सचिन कुचेकर, स्वाती माने,सुरेखा शिंदे, अरुणा गवळी, राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्ष राजश्री ताड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिलांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. घरकुल योजना, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र ,पशुवैद्यकीय दवाखाना, पंढरपूर - सातारा व भाळवणी - पिराची कुरोली या नवीन रस्त्यावर ठिकठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे गतिरोधक करणे, एसटी स्टँड व स्वच्छतागृहे बांधणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ गतिरोधक तयार करणे व पिण्याच्या पाण्याची सोय करणे, मदने वस्ती येथे अंगणवाडी सुरू करणे, भाटगरच्या पाण्याचे दर पत्रक सर्वांनी सारखी करणे, शिंदी व अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांना पत्र पाठवणे, बंद असलेले कृषी कार्यालय सुरू करणे, गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळेवर उपस्थित राहणे, महिला बचत गटास खोली,जागा उपलब्ध करून देणे,निराधार महिलांना रेशन सुरू करण्याबाबत ठराव संमत करण्यात आले.
यावेळी परिसरातील रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व सरपंच राजकुमार पाटील यांचा महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी वाघमारे यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.