पंढरपूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून निर्व्यसनी निरायम जीवन जगण्यासाठी त्यांनी आपल्या पित्यासह सर्वांशी संवाद साधला पाहिजे व कर्तव्यनिष्ठ जबाबदार नागरिक बनून कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी यथार्थपणे पार पाडली पाहिजे असा संदेश डॉ. जयंत करंदीकर यांनी दिला.
सुस्ते तालुका पंढरपूर येथील श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ,पंढरपूर संस्थेच्या श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेमध्ये आज प्रशालेचा 43 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला आले असता प्रमुख पाहुणे पदावरून करंदीकर बोलत होते .
अध्यक्षस्थानी पंढरपूर पंचायत समिती शिक्षणविस्तार अधिकारी मा.मारुती लिगाडे होते.तसेच कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ,जेष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल,जेष्ठ संचालक दिलीप घाडगे,सुनील भरले,राजेंद्र पाराध्ये,भजनदास पवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत स्नेहसंमेलन प्रमुख प्रथमेश गावडे तर पाहुण्यांची ओळख किरण बोधले यांनी केली.सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोख व वस्तू पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहवाल वाचन प्राचार्य अशोक बनसोडे यांनी केले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक,अशोक बनसोडे,पर्यवेक्षक रणजीत शिनगारे, विलास दराडे,सूरेश कट्टे,जैनुद्दीन शेख,महेश देशमुख, राजेंद्र जाधव,देवदत्त वाघ,नितीन वायदंडे, श्रीकांत चंदनशिवे, गणेश पाटील,गणेश खिलारे,नवनाथ लोणकर,विजय पंडीत, श्रीराम खूपसे,बबन कोकतरे,सविता इंगळे, प्रतिभा जावीर,सरस्वती शिंदे,धनाजी देठे,विष्णूपंत घोगले, समाधान शेजाळ,संदीप चौधरी,राजाराम घोडके,रोहीत हेंबाडे,जेष्ठ लिपिक राजकुमार ढगे,सुजीत मोरे,सुभाष देवकर,संजय निंबाळकर,बबन पवार,बाळू बनसोडे आदीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.