पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ या संघटनेची 2023 या वर्षासाठी नूतन कार्यकारणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
यावेळी पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष . संभाजी साठे ,पश्चिम महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार नवनाथ गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे ,पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा भालेराव पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा निवड पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड साहेब, महासचिव विजयकुमार लोंढे, जिल्हाध्यक्ष संग्राम कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पदाधिकारी निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी म्हणून पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष धनाजी वाघमोडे, उपाध्यक्ष श्रीराम देठे, तालुका सचिव पदी ज्ञानेश्वर शिंदे शहराध्यक्षपदी नागेश ओव्हाळ उपाध्यक्षपदी एजाज शेख, प्रसिद्ध प्रमुख बिरूदेव केंगार यांची निवड करण्यात आली.
यावेळी उद्योगपती सांगोला तालुका शिक्षक सेवक पत संस्थेच्या नूतन संचालकपदी सिताराम महाराज विद्यालय खर्डीचे सहशिक्षक भारत पाटील यांचा सन्मान वतीने करण्यात आला.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष संभाजी साठे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना निर्भीडपणे पत्रकारिता करावी. तसेच समाजात वंचित घटकांना न्याय, अन्यायाला वाचा फोडण्याची काम पत्रकारांनी करावे. संघटना कायम पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष एम.बी. भोसले सर यांनी केले तर आभार नागेश ओव्हाळ यांनी मांडले.