मुबई प्रतिनिधी - जनार्दन जंगले
शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र आणि टीडीएफ मुंबई यांचे संयुक्त आंदोलन दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिक्षण आयुक्तालय समोर पुणे करण्यात आले. खाजगी व जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांच्या गंभीर समस्या अधिक चिघळत असून दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.आंदोलनात मुख्यत्वे करून मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यात डीएस हायस्कूल, शीव या शाळेत शिक्षक आमदार कपिल पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी लॉकडाऊन मध्ये केलेल्या छळामुळे शिक्षक भारतीचे मुंबई अध्यक्ष मुख्याध्यापक कै. अंकुश महाडीक, कार्यकर्ते कै अरविंद जाधव यांच्या ऑन ड्युटी आणि शिपाई कै.ज्योतिराम झाडे यांच्या झालेल्या अकाली मृत्युची आणि सदर शीव शिक्षण संस्थेच्या महाभयंकर भ्रष्टाचाराची पथक चौकशी व्हावी म्हणून शिक्षण खात्याचे आदेश होऊन ही शिक्षण अधिकारी व आमदार कपिल पाटील जाणीवपूर्वक चौकशी होऊ देत नाही. किंबहुना शाळेचे विद्यमान मुख्याध्यापकाचे बेकायदेशीर निलंबन करून मर्जीतील प्रभारी मुख्याध्यापिका नेमणे,वर्षांनुवर्षे कपिल चे आशीर्वादाने पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदे न भरणे, शिक्षण खात्याने व अनुसूचित जाती जमाती आयोगाने आदेश देऊनही उपमुख्याध्यापक पद प्रस्ताव न पाठविणे, उलट अन्याय अत्याचाराचे विरुद्ध आवाज उठविणारे डीएस हायस्कूल शीव चे आठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुद्दाम बेकायदेशीर एकत्रित कारणे दाखवा नोटीसा देऊन शाळेत दहशत निर्माण करणे, इ.लाखो रूपयांचा वैद्यकिय प्रतिपूर्ती महाघोटाळा दडपून टाकण्यासाठी सर्व तत्कालीन शिक्षण निरीक्षक व विद्यमान शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग श्री अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक नाशिक श्री बी बी चव्हाण, नाशिक एसएससी बोर्ड अध्यक्ष श्री प्रविण अहिरे यांनी निर्दोष शिक्षकांवर चेंबूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी चौकशी करावी, आमदार कपिल पाटील, व शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे यांचेवर अमरकोर विद्यालय, भांडुप चे अन्यायग्रस्त शिक्षक श्री गोडसे यांचेकडून खंडणी वसूल करणे प्रकरणी गुन्हे दाखल व्हावे(फक्त गायकर नावाचे सहा शिक्षण उप निरीक्षक यांचेवर आणि शिक्षक भारतीचे एका कार्यकर्त्यावर ACB ने गुन्हा दाखल केला आहे) खरे गुन्हेगार मोकळे आहेत, पुणे जिल्हापरिषदेत बेकायदेशीर निलंबीत केलेल्या गेली दहा वर्षे मरण यातना भोगणारे शिक्षकांना न्याय देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, जिल्हापरिषद शाळांतील शिक्षक शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न , सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांचे भविष्य निर्वाह निधी व पेंशन आदी फायदे तात्काळ मिळवून देणे व इतर मागण्या मांडण्यात आल्या.संध्या ४ वाजता बंड गार्डन पोलिसांचे माध्यमातून शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री अरूण जाधव, समन्वयक श्री प्रकाश घोळवे, टी डी एफ मुंबई चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले यांचे नेतृत्वातील शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण संचालक श्री कृष्णकुमार पाटील आणि प्राथमिक चे उपसंचालक श्री देविदास कुलाळ यांना निवेदन देऊन प्रकरणी चर्चा करून गांभीर्य लक्षात आणून दिले, शिक्षण संचालक श्री पाटील यांनी तात्काळ सदर प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
आजचे आंदोलनात राज्य माध्यमिक संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष श्री के एस ढोमसे व सहकारी, राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री गौतम कांबळे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, पुण्याचे श्री कचरे सर, राज्य शिक्षक प्रशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री प्रशांत म्हस्केव सहकारी, टी ई टी घोटाळा विरुद्ध लढाई लढणारे समन्वय समिती चे अध्यक्ष श्री सुरेश सावळे, टी डी एफ चे पदाधिकारी श्री सुनिल वडतकर, श्रीमती तेजस्विनी लोंढे, शेख अब्दुल रहीम, माजी मुख्याध्यापक श्रीमती सरला ठाकूर, डीएस हायस्कूल शीव चे मुख्यlध्यlपक श्री सरवळे सर, तसेच श्री रमेश कांबळे, श्री संजय ठाकूर, श्री दिपक नामदेव रावते, पुणे खडकीच्या शिक्षिका आरती मॅडम, पुणे मनपा शाळेच्या शिक्षिका श्रीमती ज्योती घोळवे व अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले, जर प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर समन्वय समिती तर्फे मुंबईत सभा बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे समन्वयक श्री प्रकाश घोळवे आणि अध्यक्ष श्री अरूण जाधव यांनी जाहिर केले.