पंढरपूर प्रतिनिधी
सिंहगड इन्स्टिट्युट पंढरपूर येथे एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सिंहगड पब्लिक स्कूल, रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते हे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती रोटरी क्लबचे सचिव सचिन भिंगे यांनी दिली.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रो. श्रीरंगजी बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सिंहगड पब्लिक स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट सादरीकरण व प्रात्यक्षिके सादर करून मान्यवरांची मने जिंकली.
हे विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन दिवसभर खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सौर ऊर्जेवरील उपकरणाचे प्रात्यक्षिके, रेन वॉटर हार्वेस्टिंग, दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या वैज्ञानिक दृष्टीने बनवलेल्या वस्तूंचे खूपच सुंदर प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सादर केले .
या प्रदर्शनास रोटरी क्लबचे अध्यक्ष व सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्या स्मिता नवले, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, सचिव रो. सचिन भिंगे सह रोटरी क्लबचे सर्व सदस्य व सिंहगड इन्स्टिट्युट मधील सर्व शिक्षक
व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता. यादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पाचे सर्वञ कौतुक होत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड काॅलेज व रोटरी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.