वेळापूर प्रतिनिधी
वेळापूर धानोरे रोडला सकाळी जो अपघात झाला त्यामध्ये एका जखमी मुलास वेळापूर येथील अविराज मुंगुसकर या मुलाने कुठलीही मनामध्ये भीती न बाळगता जखमी मुलास तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे त्या मुलाचा जीव वाचलेला आहे.
त्याबद्दल वेळापूर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव व इतर पोलिस अंमलदार यांनी अविराज मुंगुस्कर याचा सत्कार करून त्याचे चांगले कामाबद्दल कौतुक केले आहे.
तसेच यावेळी प्रभारी पोलिस अधिकारी निलेश बागाव म्हणाले की अपघातामध्ये जखमी झालेल्या इसमांना नागरिकांनी तात्काळ मदत द्यावी, कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नये . व अशा अपघातामध्ये जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचा वेळापूर पोलीस ठाणे तर्फे सन्मान करण्यात येईल.
तसेच नागरिकांनी आपले वाहत चालविताना वाहतुकीचे नियम पाळून चालवावे. अतिवेगाने वाहनं चालवू नये. आजूबाजूला व पुढे मागे पाहून व्यवस्थित वाहत चालवावे तसेच लहान मुलांना वाहन चालविण्यास देवू नये अन्यथा वाहन मालकावर कारवाई करण्यात येईल.असे आवाहन बागाव यांनी केले आहे.