पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर येथे लोहार समाज युवक मंडळाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी भाळवणी येथील जय मल्हार रोलिंग शटर चे विक्रेते सुनील तुळशीराम माने यांचा सत्कार सोलापूर येथील पोलीस निरीक्षक नंदकुमार पिंगळे टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका नयना हरिहर, संस्थापक अध्यक्ष सुहास लोहार, जिल्हा अध्यक्ष बालाजी लोहार, टेंभुर्णी चे अध्यक्ष महेंद्र लोहार व समस्त लोहार समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार रामेश्वर कांबळे यांनी मांडले.