शहर उत्तर मतदारसंघात हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसला बळकट करणार
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जूना प्रभाग क्रमांक 03 मध्ये होणाऱ्या "हात से हात जोडो" अभियानाच्या पूर्वतयारीसाठी सोलापुर शहर E ब्लॉक चे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली रेवणसिद्ध मंगल कार्यालय चाटला चौक येथे आयोजित केली होती.
यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, बाबुराव अण्णा चाकोते यांचे नातू काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी अतिशय चागंली बैठक घेतली असून बाबुराव अण्णा चाकोते शहर जिल्ह्यातील राजकरणाचा केंद्रबिंदु होते. त्यांनी अनेक संस्था उभारल्या त्यांच्या माध्यमातून हजारो लोकांचे संसार उभे केले, रोजगार दिला. आजचे अनेके नेते बाबुराव अण्णाच्या दारात उभे राहत, त्यांचा सल्ला घेत मोट्ठे झाले आहेत या मतदारसंघात चाकोते परिवाराची ताकद मोट्ठी आहे. त्यांच्या सहकार्याने शहर उत्तर मतदारसंघात हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसला बळकट करणार जरी आज पक्ष संकटात असला तरी उद्याचा दिवस आपला आहे. सत्तेचा ताम्रपट कोणीही कायमचा घेऊन आलेला नाही त्यामुळे महापालिकेवर तिरंगा फड़काविण्यासाठी, काँग्रेस पक्षाचे हात, राहुलजी गांधी, शिंदे साहेब, प्रणितीताई शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आत्ता कामाला लागावे असे म्हणाले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते म्हणाले की, शहर उत्तर मतदारसंघ हा बाबुराव अण्णा असताना बालेकिल्ला होता. या मतदारसंघात हात से हात जोडो अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर अलकाताई राठोड, माजी नगरसेवक सिद्धराम चाकोते, गणेश डोंगरे, विश्वराज चाकोते, केशव इंगळे, NK क्षीरसागर, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, प्रवीण जाधव, महेश लोंढे, प्रेम चाकोते, तिरुपती परकीपंडला, इलियास शेख, विजय सालुंखे, संजय होमकर, मधुकर आठवले, नागनाथ कदम, पशुपती माशाळ, मल्लीनाथ सोलापुरे, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, चंद्रकांत टिक्के, संघमित्रा चौधरी, श्रीकांत दासरी, अनिल हलकट्टी, कल्याणराव चौधरी, शोभा बोबे, नागनाथ गज्जम, विकी चाकोते, आनंद खटके, दिपक विजापूरे, नागेश कदम, पप्पू कलशेट्टी, बबलू परचंडे, उमेश पिस्के, शितल निकम, रितेश भोसले, मल्लू कलशेट्टी, गुरुराज पदमगोंडा, लखन सुरवसे, संभाजी वडतीले, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.