बारा राशीची गुणवैशिष्ट्य तीन मिनिटाच्या गाण्यात..
मुंबई प्रतिनिधी
आज आपण " आलाय माझ्या राशीला " या चित्रपटाचे थीम सॉंग संध्याकाळी प्रदर्शित करणार आहोत. प्रवीण कुवर यांनी ते संगीतबद्ध केला असून कौतुक शिरोडकर यांनी ते शब्दबद्ध केले आहे. मी एक लेखक आहे पण कवी नाही त्यामुळे मला गाण लिहिणे वगैरे शक्य नव्हते.अशी माहिती निर्माता आनंद पिंपळकर यांनी तेज न्यूज चॅनलला दिली.
त्यावेळेस पिंपळकर म्हणाले, धमाकेदार गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले प्रवीण कुवर त्यांची नुकतीच ओळख झाली आणि त्यांना जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांनी राशीची गुणवैशिष्ट्ये असलेले गाणे तयार करणे हे एक चॅलेंज असल्याचे सांगितले आणि मग सुरू झाला या गाण्याचा प्रवास.हे title song म्हणजे शीर्षक गीत आहे पण शीर्षक गीत कसे धमाकेदार हवे,म्हणून गायिका कोण ह्यामध्ये ही खूप चर्चा झाली आणि कडक आवाजाची मुगधा कराडे हे नाव फायनल झाले.
मग हे गाणे चित्रपटात घ्यायचे की नाही यावरून भरपूर उहापोह झाले. पण चित्रपट सर्व वयाच्या प्रेक्षकांना आकर्षित करणारा ठरावा म्हणून थोडेसे हे तरुणाईचे गीत म्हणूनही घेण्यात आले.आणि तीन मिनिटाचे गाणे मुग्धा कराड येणे एवढे धमाल गायले की सांगता सोय नाही.आज संध्याकाळी सात वाजता तुम्हाला ते माझ्या यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल.पहिल्या अंतरामध्ये सहा राशींचे वैशिष्ट्य दुसऱ्या मध्ये दुसऱ्या सहा राशींचे वैशिष्ट्य अगदी एक शब्दात व्यक्त करताना कविला अत्यंत अवघड गेले.पण संध्याकाळी तुम्ही गाणे बघा तुम्ही खुश होऊन जाल...... नक्कीच