सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत प्रांत 32 34 ड-१ रिजन-१ व लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी आणि युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन UBO यांच्या संयुक्त विद्यमाने IMA हॉल येथे ई-वेस्ट ड्राईव्ह प्रोग्राम मॅनेजमेंट स्टार्टअप व इंटरापॅनल शिप याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी आय एम ए हॉल येथे सेमिनार घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष सिद्राम हंचाटे सर यांनी करत UBO च्या कार्याची माहीती दिली.
तर यावेळी ई- वेस्ट प्रोग्राम या विषयावर आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना ई-वेस्ट चे विभागीय सभापती तथा लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे यांनी लायन संदर्भात थोडक्यात माहिती दिली त्यानंतर ई-वेस्ट व मॅनेजमेंट या विषयावर समाजाला मार्गदर्शन करताना लायन्स चे उपविभागीय सभापती लायन शैलेशजी कोरवार यांनी ई-वेस्ट मुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचे नुकसान याबद्दल सविस्तर माहिती देत बहुमोल मार्गदर्शन केले त्यानंतर स्टार्टअप व इंटरपॅनल शिप या विषयासंदर्भात नाविन्य कल्पना व सोलापूरकरांसाठी निर निराळ्या रोजगाराच्या संधी याविषयी थिंक ट्रेन्स फाउंडेशनच्या संचालक तथा पुणे येथील सिडॅक कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर परिमल खाडे सर अमूल्य असे मार्गदर्शन केले.
यावेळी कामतकर क्लासेसचे सुनील कामतकर , वालचंद अभियांत्रिकी विद्यालयाचे केशव वळसे तसेच युनायटेड भावसार चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे सर लायन्स क्लबचे सचिव रवी वायचळ, खजिनदार राजेश परसगोंड यांच्या सह UBO चे सर्व सन्माननीय सभासद व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव रवी लाडे यांनी केले.