संत गाडगेबाबांच्या जयंती दिवशी सन्मान "जागर"टीम व "करकंब गावच्या लेकीचं झाड"अभियान टीमला प्रेरणादायी
करकंब प्रतिनिधी
सोलापूर आज संत गाडगेबाबा जयंती आणि ही जयंती जिल्हा परिषद सोलापूर यांचे वतीने आदरणीय सी.ई.ओ,प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यकारी अधिकारी सचिन जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावीर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी पंडीत भोसले, आणि करकंब येथील जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी संत गाडगेबाबा यांनी अनेक गावोगावी फिरून गावांची स्वच्छता करत करत कीर्तनातून लोकांच्या मनाचीही स्वच्छता करत,आणि समाजाला स्वच्छतेच महत्व पटवून देण्यासाठी समाज सुधारावा, अंधश्रद्धा निर्मूलनाच काम केलं,गरीबांना शिकवा त्यांना मदत करा,देव माणसात आहे सर्वां बरोबर प्रेमानं वागा यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले,असं मनोगत अधिकारी कुलकर्णी आणि शेळकंदे साहेबांनी सांगितले.
हीच प्रेरणा घेऊन करकंब मधील महिला,पुरुष यांनी एकत्र येत गेलं वर्षभर जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी एका प्रभागाची स्वच्छता व जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत अधिकारी ईशाधीन शेळकंदे साहेबांनी जागर टीमच कौतुक केले.पुढं आणखी जोमान काम करण्यासाठी जागर टीम सदैव प्रयत्नशील असून याच कार्याचा गौरव करण्यासाठी जागर टीमच्या स्वच्छतादुतांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूर यांचे वतीने आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर,, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक स्वच्छता अधिकारी सचिन जाधव,यांनी केला.
यामुळे आणखी उर्जा आणि प्रेरणा मिळाली असून दिलीप स्वामी यांनी जागर टीमच कौतुक करत सर्वांना जिल्हा परिषदेच्या वतीने नक्कीच चांगलं सहकार्य करु असं सांगून जागर टीमचा उत्साह वाढविला, यावेळी जिल्हा परिषद सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते