कराड प्रतिनिधी
पारधी मुक्ती आंदोलनाचे नेते आणि दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे (भाऊ ) यांना कोल्हापूर येथील 'सेक्युलर प्रोग्रेसिव्ह आणि मुक्ता फाउंडेशन यांच्या वतीने 'व्यक्तीवेध' पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराड येथे भव्य सत्कार करण्यात आला.
कराड येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रमोद सुकरे, शशिकांत पाटील, देवदास मुळे, गोरख तावरे आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन प्रकाश वायदंडे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रमोद तोडकर, दिलीप महाजन,सुधीर पाटील,विशाल पाटील, सकलेन मुलाणी, अभयकुमार देशमुख, अजिंक्य गोवेकर सह असंख्य पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विश्वास मोहिते यांनी केले तर आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले.