मारापुर प्रतिनिधी
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार मा. समाधानदादा आवताडे यांची विधिमंडळ सभागृह अंतर्गत सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मारापूर नगरीचे लोकनियुक्त सरपंच मा. विनायकराव यादव यांच्या नेतृत्वाखाली मा. बालाजी यादव यांच्या हस्ते भारतीय लोकशाहीचे प्रतीक राजमुद्रा स्तंभ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. मारापूर नगरीतील ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या या आगळ्या- वेगळ्या सन्मानाने आमदार भारावून गेले.
आमदार दालनामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करत आ. आवताडे म्हणाले की, एक उच्च विद्याविभूषित आणि व्यावसायिक व्यासंग यांची सांगड घालून गावपातळीवरील सर्वसामान्य जनतेचा विकासात्मक मार्ग तेजोमय करण्यासाठी जनतेच्या बैठकीतून सरपंच पदावर विराजमान झालेले विनायक यादव आपल्या सर्वांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या कर्तव्यसेवेची खुर्ची सत्कारणी लावतील त्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असेन.
यावेळी जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक सरोजभाई काझी, शशिकांत चव्हाण, येताळा भगत सर,राजकुमार यादव, भगवान आसबे, उपसरपंच अशोक आसबे ,पुरवठा निरीक्षक व इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.