पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या दि.०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ या कालावधीतील नित्यपुजेचे अर्ज घेण्यास दि. १९/०२/२०२३ पासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती मा. सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
याबाबत मंदिरे समितीच्या नित्योपचार उपसमितीच्या दि. १८/०१/२०२३ रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस मा. सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगांवकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, तसेच कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व अनिल पाटील, लेखा अधिकारी व संजय कोकीळ, अनुपालन अधिकारी उपस्थित होते.
त्यामध्ये दि.०१/०४/२०२३ ते दि. ३१/०३/२०२४ या कालावधीतील श्रींच्या नित्यपुजेचे अर्ज घेण्यास दि. ११/०२/२०२३ पासून सुरुवात करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपुजेसाठी अनुक्रमे रु. २५,०००/- व रु.११,०००/- इतके देणगी मुल्य असणार आहे.
सदर पुजा बुकींगसाठी आवश्यक असलेल्या अर्जाचा नमुना व माहिती मंदिर समितीच्या कार्यालयात आले आहे.
https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
तसेच ज्या भाविकांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे हजर राहून पूजा बुक करता येणार नाही, अशा भाविकांनी वरील नमूद अधिकृत संकेतस्थळावरून नित्यपूजेचा अर्ज डाऊनलोड करून सदरचा अर्ज cotemple@gmail.com या ई मेलवर किंवा रजिष्टर पोष्टाने किंवा कुरियरव्दारे पाठविणेत यावेत, असे आवाहन मा. सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

.jpg)