वर्धा जिल्हा प्रतिनिधी आकाश सुखदेवे
वंचित बहुजन आघाडी च्या राज्य कमेटी उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय वर्धा येथे भेट दिली.यावेळी वर्धा जिल्हा अध्यक्ष अजय घंगारे यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुषमा दुपारे,तालुका उपाध्यक्ष निता गणवीर,जिल्हा सचिव संदीप नगराळे यांनी सुद्धा पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.राज्य कमेटी उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख या विद्रोही कवी संमेलना च्या निमित्ताने वर्धा येथे आलेल्या आहेत.
तसेच रमाई जयंती ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या ,जवळ होणाऱ्या महिला कवी संमेलनाला त्या उपस्थित राहतील असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी सिद्धार्थ डोईफोडे महासचिव,सहदेव चाटे व अनेक कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते.