सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवरायांच्या जयंती अत्यंत जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात आले त्याचबरोबर लहान मुलांच्या मंडळांना शिवरायांचे ५१ मूर्ती वाटप करण्यात आले
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमात प्रारंभी शिवरायांचे मूर्तीचे पूजन सौ नागमनी भंडारी यांच्या हस्ते सौ शिंदे ताई सौ रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर विष्णू कारामपुरी (महाराज) यांनी शिवरायांच्या पराक्रमाबद्दल व हिंदवी स्वराज्य स्थापना बाबत अनेक इतिहासाचे उदाहरण सांगितले आणि ५१ बाल शिवजयंती मंडळांना मूर्ती वाटप करण्यात आले
सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह नागमणी भंडारी, शिंदे ताई, रेखाताई अडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, शिवा सारंगी, नागार्जुन कुसुरकर, रजवा वाडनाल, व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
बालगोपालांनी शिवरायांचे मूर्ती घेताना छत्रपती शिवाजी महाराज, की जय जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव असे घोषणा दिल्या.