*शहरातील कुत्र्यांची जनगणना झालीच नाही त्याच बरोबर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या बाबत महापालिका कडे माहिती नाही तरी देखील महापालिका ने लाखो रुपयाचे बिले दिलेच कसे*? असा सवाल ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी महापालिका आयुक्त यांना विचारला असून यापूर्वी यशवंत पवार यांनी कुत्रे निर्बीजी प्रकरणी महापालिका अप्पर आयुक्त तसेच उपायुक्त यांच्याकडे तक्रारी करून देखील महापालिका अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर यशवंत पवार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करून कुत्रे निर्बीजीकरण प्रकरणी संबंधित संस्थेवर व पदाधिकाऱ्याची स्वतंत्र वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
त्याचबरोबर या संस्थेला काळ्या यादीत टाकून महानगरपालिकेने दिलेले लाखो रुपये वसूल करण्यात यावेत व संस्था चालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करून संबंधित संस्था चालकावर गुन्हे दाखल न केल्यास महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी महापालिका आयुक्त यांना दिला आहे