सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड कार्यालयाच्यावतीने रामबाग भोर पुणे येथे आयोजित राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात सोलापूर शहर- जिल्ह्यातील ११ शाळेतील ८३ स्काऊटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सोलापूर विभागाचे १०० टक्के निकाल लागला. शाळा निहाय निकाल पुढीलप्रमाणे -श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला सोलापूर -१५ स्काऊटर, नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल सोलापूर -११ स्काऊटर, संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा-८ स्काऊटर,नागेश करजगी स्कूल सोलापूर-८ स्काऊटर, महात्मा गांधी ओपन युनिट -८ स्काऊटर , रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब पंढरपूर -८ स्काऊटर,दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर -६ स्काऊटर,एस.व्ही.सी.एस. हायस्कूल बोरामणी-५ स्काऊटर,एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एम.आय.डी.सी.-५ स्काऊटर, स्काऊटर, मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरेनगर सोलापूर -६ स्काऊटर,राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला सोलापूर-३ स्काऊटर, असे एकूण -८३ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
सर्व यशस्वी स्काऊटर, मार्गदर्शक स्काऊट मास्टर, मुख्याध्यापक यांचे सोलापूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालयाचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय जावीर, जिल्हा आयुक्त स्काऊट तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, सहचिटणीस दत्तात्रय गाजरे, माजी शिक्षण अधिकारी विद्याधर जगताप,जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा गाईड संघटक अनुसया सिरसाट , जिल्हा प्रशिक्षण स्काऊट आयुक्त शंकरराव यादव व कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.