पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची चारचाकी वाहन चोरी, मोटारसायकल चोरी तसेच मोबाईल चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ९,८३,०००/रू किंमतीचा मुद्देमाल जप्तीची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं १) ८०५/२०२२ भादवि कलम ३७९२) गुरनं ७९७ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे ३) ७९२/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे ४) ८०६ / २०२२ भादवि कलम ३७९५) ४०१/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हे पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे उघडकीस आणुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008१) गुरनं ८०५/२०२२- भादवि क ३७९ यामधील चोरीस गेलेली ३५,०००/-रु किं ची एक होंडा कंपनीची ड्रीम युगा मॉडेलची काळ्या रंगाची मोटार सायकल सह इतर ७,९५,०००/- रु किमतीच्या एकुण ०९ मोटारसायकली जप्त करणेत आलेल्या आहेत. २) गुरनं ७९७/२०२२-भादवि कलम ३७९ मधील वाळुसह चोरीस गेलेला १,०३,०००/-रू किं एक अशोक लेलंड कंपनीचा दोस्त मॉडेलचा पिवळे रंगाचा पिकअप जप्त केला. ३) गुरनं ७९२ / २०२२-भादवि कलम ३७९ यामधील चोरीस गेलेली ३०,०००/-रु किंमतीची एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची सी बी शाईन मोटार सायकल जप्त केली आहे ४) गुरनं ८०६ / २०२२ भादवि कलम ३७९ यामधील चोरीस गेलेली ४०,०००/-रु किंमतीची एक यामाहा कंपनीची एफ झेड मोटार सायकल जप्त करणेत आलेले आहे. ५) गुरनं ४०१/२०२२-भादवि कलम ३८० दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला एक विवो प्रो कंपनीचा १५,०००/-रू किंमतीचा मोबाईल हँडसेट जप्त करणेत आलेला आहे. वरील ०५ गुन्हयामध्ये ०९ आरोपी कडुन एकुण ११ मोटारसायकली, ०१ पिकअप व ०१ मोबाईल असा ९,८३,०००/- रु किमंतीचा चोरी गेलेला मुद्देमाल गुन्हे उघडकीस आणुन जप्त करणेत आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे , अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, विक्रम कदम व अरुण फुगे , पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि चिमणानी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागेश कदम, राजेश गोसावी, पोहवा ४१९ शरद कदम, पोहवा ३९६ सुरज हेंबाडे, पोहवा १०६३ ढेरे, पोना १७३६ सचिन इंगळे, पोना ४८४ सुनिल बनसोडे, पोना १७८९ सचिन हँबाडे, पोना १६५७ दादा माने, पोना ५६२ राकेश लोहार, पोकॉ १२१६ शहाजी मंडले व सायबर सेलचे पोकॉ अन्दर आतार यांनी केली आहे.