वर्धा जिल्हा प्रतिनिधी
स्वराज्याचे द्वितीय छत्रपती आणि छावा या नावाने जागतिक रित्या ओळखल्या जाणारे संभाजी महाराज यांचा ३४२ वा राज्याभिषेक सोहळा हा बोरगाव मेघे येथे अगदी जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवशंभु भक्त परिवार, बोरगाव मेघे आणि स्वराज्य संघठण वर्धा यांचा, आणि समस्त बोरगाव मेघे ग्रामस्थ यांनी अगदी उत्साहाने हा सोहळा साजरा केला. आधी संभाजी महाराज यांची पालखी ही भजन, कीर्तन यांच्या साथीने संपूर्ण बोरगाव मेघे येथे फिरवण्यात आली. त्यानंतर राजेंची आरती ओवाळण्यात आली. आणि अल्पहार करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नृत्य करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी. म्हणून आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले, युवा उद्योजक प्रशांत अवचट, राहुल मून, सोनल जी ठाकरे, निर्माते छत्रपती संभाजी महाराज स्मारक,रामभाऊ लष्कर, जिल्हाध्यक्ष मी वडार संघटना हे उपस्थित होते.
तसेच विशेष अतिथी म्हणून संतोष सेलूकर, सरपंच,मोहन येळणे उपसरपंच,मनोज तराळे उपाध्यक्ष भाजपा,प्रदीप मेघे माजी सरपंच,स्वप्नील उगेमुगे आणि नितीन डफळे ग्रामपंचायत सदस्य,प्रवीण देवढे पोलीस पाटील जामठा,अतुल टेकाम,पंकज सायंकार माजी जि प सदस्य,प्रा अतुल शेंडे, नंदू मून. स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष, आकाश सुखदेवे, जिल्हा संपर्क प्रमुख स्वराज्य संघटना यांनी प्रामुख्याने सहभाग दर्शविला.
कार्यक्रम करिता पारस बाभुळकर या युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामीण संघठक यांनी आणि अक्षय जावळेकर, आनंद खडकाळे, ओम वैद्य, प्रतीक पवार,, तेजस बाबुळकर, अश्विनी देशमुख, मंदार महलेवार, समीर हिवरकर, कपिल वरघणे, यश फाटे, करण गिरपुंजे व बोरगाव मेघे ग्रामस्थ, महिला यांनी सोहळ्या साठी विशेष परिश्रम घेतले.