पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित कवठेकर प्रशाला द ह कवठेकर प्रशाला पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श बाल व प्राथमिक विद्यालय अध्यापक विद्यालय या सर्व विद्यार्थ्यांची अमृत महोत्सवी वर्षांमध्ये भव्य अशी शोभायात्रा दिनांक 24 जानेवारी रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
या शोभा यात्रेमध्ये जवळजवळ 05 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अतिशय सुंदर अशा झालेल्या शोभायात्रेमध्ये 05 घोडे 07 रिक्षा तसेच 2-3 ट्रॅक्टर व 05 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग शोभा यात्रेतील विद्यार्थ्यांचे कौतुक पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी केले. जवळजवळ एक तास जागेवर खिळवून ठेवणारा हा शोभा यात्रेचा दिव्य सोहळा जागेवरच उभा राहून सर्व पंढरपूर वासियांनी पाहिला व त्याच्या प्रतिक्रिया ही त्यांनी दिल्या. आमच्या सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांचे जवळ जवळ पंधरा दिवसापासून यामागे परिश्रम होते. तसेच विवेक परदेशी संस्थेचे अध्यक्ष नाना मालक कवठेकर सेक्रेटरी एस आर पटवर्धन संस्थेचे सदस्य तसेच सर्व शाखाप्रमुख यांच्या उपस्थितीत डी वाय एस पी विक्रम कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली . या शोभा यात्रेची कल्पना संस्थेचे सेक्रेटरी एस आर पटवर्धन यांची होती. त्याला सर्व युनिटचे प्रमुख यांनी सहकार्य केले.
यामध्ये कवठेकर प्रशाला मुख्याध्यापक वि वाय पाटील, द ह कवठेकर प्रशाला मुख्याध्यापक व्हीं एम कुलकर्णी, आदर्श बाल व प्राथमिक मुख्याध्यापिका माया कुलकर्णी , अध्यापक विद्यालय प्राचार्य श्रीयुत वाघमारे , पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल प्रिन्सिपल सुनीता मोहोळकर , या सर्व युनिटच्या प्रमुखांनी तसेच त्यांच्या सर्व शिक्षक बंधू सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन अतिशय उत्कृष्ट असे रॅलीचे नियोजन केले आणि हा भव्यदिव्य सोहळा पार पडला.

