देवडे प्रतिनिधी एस. मस्के
देवडे ता.पंढरपुर या गावामध्ये कोणाचेही दु:खत निधन झाले तरी लोकप्रिय सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे ह्या स्व:ता स्व खर्चाने त्या मयत झालेल्या व्यक्तीचे बॉनर ( डिजीटल ) एका दिवसा मध्ये छापुन ग्रामपंचायत कार्यालय समोर लावतात.
गावातील कोणतीही व्यक्ती मयत झाली तरी सरपंच प्रतीनिधी सोमनाथ झांबरे त्यांच्या घरी जाऊन त्या मयत व्यक्तीचा फोटो घेऊन एका दिवसामध्ये डिजीटल बैनर छापुन तयार करून आणुन ग्रामपंचायत कार्यालय समोर चिटकवतात.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008कारण त्या मयत व्यक्तीने त्याच्या कुटुंबासाठी ,गावासाठी ,समाज्यासाठी काही ना काही योगदान केलेले आहे,त्या मयत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार देण्याच काम ग्रामपंचायत करत आहे आणि त्यांची एक गावाला उणीव व पोकळी भरुन काढण्यासाठी त्या कुटुंबा सोबत राहण्याची जबाबदारी घेतली जाते व त्यांच्या कामाची गावाला जाणीव व्हावी व शेवटची आठवण गावासाठी रहावी,त्या मयत व्यक्तीच्या आत्मास शांती लाभावी म्हणुन त्यास भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली जाते,शोकाकुल ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ देवडे म्हणुन देवडे गावचे लोकप्रिय सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी एक सामाजिक आगळा- वेगळा अनोखा उपक्रम गावामध्ये राबविला आहे,या उपक्रमाचे स्वागत पंचायत समिती चे बि.डी.ओ. प्रशांत काळे ,टी.पी.यु. मा.नलवडे ,ग्रामसेवक बिरादार यांनी केले असुन या उपक्रमाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. या उपक्रमाबद्दल सरपंच प्रमिला झांबरे यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.