पळशी प्रतिनिधी प्रा.अशोक लोखंडे
भाळवणी दि.28 डिसेंबर 2022 रोजी सायं.5.30 वा. तेज न्यूज या पोर्टलचा तिसरा वर्धापन दिन जल्लोष आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस समारंभचे संयोजक व तेज न्युजचे संस्थापक संपादक प्रशांत माळवदे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात आपल्या चॅनेल चा लेखा जोखा,येणाऱ्या अडचणी व भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक साधन सामग्रीची गरज स्पष्टपणे सांगितले.आणि यापुढे बातम्याबरोबर जाहिरातीची ही मदत व सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यापुढे आपण या वर्धापनदिनी विविध क्षेत्रातील असामान्य कार्य करणाऱ्या आपल्या भागातील व्यक्तींना एक प्रेरणा व स्फूर्ती मिळण्यासाठी त्यांना शाबासकीची थाप म्हणून आपण आपल्या समाजाचे गावाचे व देशाचे देणे लागतो या भावनेने सामाजिक कर्तव्य समजून या वर्षीपासून त्यांना पुरस्कार देणार असल्याचे सांगितले.
यानंतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर यांचा स्वागत सत्कार करण्यात आले. यामध्ये स. शि. वसंतराव काळे सह. सा. कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा. कल्याणराव काळे यांची महाराष्ट्र राज्य साखर महासंघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर पंढरपूर पं. स. चे सदस्य व शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे शिंदे यांची श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांचे विविध,प्रश्न सोडविण्यासाठी कायम लढा देणारे पत्रकार सुरक्षा समितीचे प.महा.अध्यक्ष रामचंद्र सरवदे तसेच भाळवणीचे सरपंच राजकुमार पाटील यांनी ग्रामपंचायतमधील क्रांतिकारी काम केले , केसकरवाडीचे संजय मासाळ विकास सोसायटीत नवीन पॅनल टाकून सोसायटीत प्रवेश केला तर पळशी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील प्रा. अशोक लोखंडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये कासाळगंगा या ओढ्याला आलेल्या महापुरातून सात जणांचे प्राण वाचविले त्यांच्या धाडसबद्दल या सर्वांना सन्मानपत्र,शाल,श्रीफळ, हार,पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
तदनंतर सत्कारमूर्ती मा. संभाजीराजे शिंदे यांनी आपल्या मनोगतात आपल्या मिश्किल शैलीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकून प्रशांत माळवदे तात्या यांना धन्यवाद दिले. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी मा. उद्धवजी ठाकरे यानी विश्वासपात्र राहून पार पडणार असल्याचे सांगून तेज न्यूज ला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती कल्याणराव काळे यांनी आपण करत असलेल्या कामाची पावती म्हणजे सत्कार पुरस्कार असतात. आपण काम करतो पण आपली दाखल कोण घेत नाही अशी खंत व्यक्त करून माळवदे व माझे सारखेच आहे असे म्हणून उपस्थितात हास्यकल्लोळ निर्माण केला. आपण यापुढील काळात तेज न्यूज साठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष भाषणात मा. ई. बा. इनामदार गुरुजी यांनी आपल्या शाळेसंबंधित घडामोडी व आपल्या काळातील इतिहास जमा गोष्टी सांगून शालेय व सामाजिक आठवणीना उजाळा देऊन रयत ची शाळा उभारणीसाठी गावाचा संघर्ष व गावाच्या विकासात स्व. वसंतराव काळे यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून तेज न्यूज परिवारास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांगोला विधान सभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वतीने दिग्विजय पाटील यांनी सन्मान पत्र व सत्कार स्वीकारला.
यावेळी दिलीप भानवसे,शहाजी साळुंखे, दिपक गवळी,विजय शिंदे,अर्जुन लिंगे,प्रवीण शिंदे,सुनील पाटील,काका म्हेत्रे,अर्जुन जाधव,राजाराम पाटील,दाऊद शेख, लुकमन इनामदार,हणमंत जमदाडे,रणजीत जाधव,पोपट इंगोले,मनोज डंबाळ, धनंजय धोत्रे, भिमराव जाधव सर, सतीश साळवे, निहाल शेख,सचिन कुचेकर, शशिकांत विभुते,धोंडिराम शिंदे, पिंटू निराळी, मुन्ना इनामदार,दत्ता गोफणे, विठ्ठल मासाळ,आत्माराम गाढवे,नाना केसकर,रामचंद्र केसकर,लक्ष्मण केसकर,विष्णू मासाळ,राजकुमार मासाळ,दत्ता मासाळ,महेश शिंदे,विठ्ठल लिंगे,ओम लिंगे,पत्रकार सुरक्षा समितीचे रवींद्र शेवडे, दत्ताजी पाटील,दिनेश खंडेलवार, रफिक आत्तार, चैतन्य उत्पात, अमोल गुरव,रामकृष्ण बिडकर,प्रवीण शहा,विजयकुमार मोटे,अक्षय जाधव, पवन बोधे, प्राची माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ चि.ओंकार माळवदे व मान्यवर यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले.प्रास्ताविक प्रशांत माळवदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सविता ताकभाते व साक्षी माळवदे यांनी केले.तर आभार आनंद देशपांडे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.