पिंपळनेर प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.
त्यामध्ये पिंपळनेर ता.माढा येथील शिवसेनचे युवा कार्यकर्ते शुभम ऊर्फ शंभूराजे नवनाथ फुगे यांची युवा सेना माढा तालुका उप अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली . त्यांच्या निवडीनंतर तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठविलेल्या पत्रकाद्वारे नियुक्तीची माहिती कळविली आहे.
विमा पॉलिसी संपर्क - 8329354008
युवा सेना माढा तालुका उप अधिकारी या पदाच्या माध्यमातून शिवसेनेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे) दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत युवा सेनेसह शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केले जाईल असे निवडीनंतर बोलताना शुभम ऊर्फ शंभूराजे फुगे यांनी सांगितले.