मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
श्री. काळभैरवनाथ रहिवासी संघ मुंबई ( उदापूर ) यांच्यावतीने आंम्ही उदापूरचे मुंबईकर या स्नेहमेळावा नुकताच कै.अण्णासाहेब पाटील सभागृह कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
स्नेहमेळाव्यास मुंबई व मुंबई उपनगर परिसरातील बहुसंख्य उदापूरचे मुंबईकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षका वैशालीताई शिंदे व सन्माननीय उपस्थितांमध्ये स्नेह मेळावा नियोजन समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे, संत सावता माळी मंडळ मुंबई उदापूरचे अध्यक्ष विष्णू शिंदे, उपयुक्त वस्तू व सेवा कर विभाग मुंबई आदरणीय देवेंद्र शिंदे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई विनोद शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई नामदेव शिंदे,अवर सचिव मंत्रालय मुंबई अरुण शिंदे, महासचिव राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ ठाणे जिल्हा केशव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई अशोक शिंदे, फळ विभाग व्यापारी असोसिएशन वाशीचे अध्यक्ष सतीश डोके, माजी मुख्य अभियंता बीईएसटी मुंबईचे छबुराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईची रमेश म्हसणे,उच्च न्यायालय मुंबईचे वकील अशोक लोखंडे, कार्पोरेट विभाग मुंबईचे वकील प्रशांत कुलवडे, मेडिकल असोसिएशन ऐरोली नवी मुंबई विभाग प्रमुख विकास कुलकर्णी, राजाराम पाटील वृद्धाश्रम पांगरी माथा जुन्नर चे खजिनदार उत्तम विनायक चौधरी उपस्थित होते.विघ्नहर्ता गजानन व ग्रामदैवत काळभैरवनाथाचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी स्नेहभोजन,कौटुंबिक परिचय, सांस्कृतिक कार्यक्रम,महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.वैशालीताई शिंदे व इतर मान्यवरांनी उपस्थितांना आपली संस्कृती तसेच आजचा तरुण वर्ग कसा असावा याविषयी प्रबोधन केले. स्नेहमेळावा नियोजन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,सदस्य व सर्व उपस्थितांमुळे कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. विशाल शिंदे व विशाल कुलवडे यांच्या युट्युब लाईव्ह प्रक्षेपण व फोटोग्राफी सौजन्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष उपस्थित न राहता कार्यक्रम पाहता आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत आदर्श शिक्षक उद्धव अमुप सर यांनी केले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस मित्र संतोष शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.