खडकी प्रतिनिधी
खडकी येथील दुर्गामाता मंदिर, गाडी अड्डा येथील दुर्गामाता मंदिरावर कळस स्थापना करण्यात आले. मन्नेवार समाजाच्या वतीने कळस पूजनाचा कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास असंख्य भाविक उपस्थित होते.
या कार्यक्रमास शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, पुणे महानरपालिकेच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मन्नेवार समाजाचे अध्यक्ष मुकेश कोरबोल्लू, प्रदिप मेटेल्लू, विजय मेटेल्लू, भगीरथ साकळे, बालकिशन गोलेल्लू, रवींद्र नासू, गणेश मुत्तय्या, रमेश मानेल्लू, उमेश सूकेल्लू, रमाकांत कोरबोल्लू, हिरालाल केदल, रुपेश टिकेल्लू यांनी परिश्रम केले. यावेळी राहुल कांबळे, भरत रास्ते, नाना अंगिर, राजू जाधव, शरद रोच, धनंजय देशमुख उपस्थित होते.