पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न,विश्वरत्न,विश्वविभूषण, कायदे पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोटस इंग्लिश स्कूलच्या प्रचार्या.डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्या आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप मोठे आहे.जगामध्ये जे उच्चशिक्षित व बुद्धिमानी लोक आहेत त्यांच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अग्रस्थानी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक,राजकीय,वैचारिक. कार्य खूप मोठे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगाला शांततेचा मार्ग देणारा बौद्ध धर्म त्यांनी १४ऑक्टोबर १९५६ रोजी स्वीकारला त्याचे मुख्य कारण म्हणजे हा धर्म शांततेचा पुरस्कार करणारा आहे.आणि या धर्मात अष्टांग मार्ग सांगितले आहेत. तसेच अनेक अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतातअशा प्राचार्या.डॉ. जयश्री भोसले म्हणाल्या.
यावेळी शाळेचे विभाग प्रमुख शिक्षिका सविता झांबरे, अमृता बाबर, ऋतुजा ओव्हाळ तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी श्रेयस मोटे,भार्गव घाडगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी देखील अभिवादन केले.