सर्व विजय संघांची तालुकास्तरावर निवड
उंबरे पागे प्रतिनिधी
केंद्र उंबरे पागे येथे नुकत्याच पार पडलेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जि. प. प्राथमिक शाळा जळोली च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कबड्डी, खो-खो , लगंडी , 100 मी.धावणे, 200 मी.धावणे, बुद्धीबळ अशा सर्वच खेळ घेण्यात आले. या मध्ये जळोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले, दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वसाधारण विजेतेपदाचा डंका वाजवला आणि सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली.
या स्पर्धेमध्ये जळोली शाळेने
1) लंगडी - लहान गट :- मुले - प्रथम क्रमांक 2) मुली - प्रथम क्रमांक 3) लंगडी - मोठा गट :-मुले - प्रथम क्रमांक 4) कबड्डी :- मोठा गट - प्रथम क्रमांक 5) बुध्दीबळ - मोठागट :- मुले - प्रथम क्रमांक संग्राम नवगिरे - ६ वी
विद्यार्थ्यांचे प्रयत्न, शाळेचे मुख्याध्यापक गणपत मोरे सर, पदवीधर शिक्षक जयवंत कापसे सर सहशिक्षक संतोष कापसे सर, गोरे सर, खारे सर, गवारे सर, पटवेकर सर, शिंदे सर, नरसाळे सर, सोमनाथ पवार सर यांनी घेतलेली मेहनत, त्याला पालकांची दमदार साथ यांमुळे हे यश मिळाले.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख पांडुरंग जाधव सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ नरसाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संतोष जाधव, जळोली गावचे सरपंच ज्योतीराम तात्या मदने व उपसरपंच मनोज भाऊ नरसाळे, मुख्याध्यापक तसेच इतर गावातील सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.