चंद्रभागानगर, भाळवणी प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इस्टिटयुट,पुणे येथे राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी महिलांसाठीआयोजित केलेल्याचार दिवस मार्गदर्शन,शिबीर मध्ये सहकार शिरोमणीच्या बहुसंख्य महिला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होवुन, शिबारामध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रति एकरी उत्पादनवाढविणार असल्याचे सहभागी महिलांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट यांच्या वतीने प्रति वर्षी ऊस शेती ज्ञानयाग,ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण इ.विविध शिबीरे व मेळावे आयोजित करण्यात येतात. यंदाही शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला ऊस उत्पादक शेतक-यांना श्रमाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणूनसहकार शिरोमणी कारखान्याच्या वतीने मुक्ताई महिला आदर्श ऊस उत्पादक शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे.सदर गटातील महिलांना हंगामनिहाय सुधारीत ऊस जातीचे नियोजन,त्रिस्तरीय पध्दतीने बेणे निवड करणे,आंतरपीक घेताना योग्य पिकांची निवड करणे,पाण्याचे नियोजन करणे,संतुलित खतांचा वापर करणे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे,रासायनिक तणनाशकांचा अंतर्भाव करून ऊसातील तणावर नियंत्रण करणे,ऊस उत्पादकता वाढी बरोबरच कमी खर्चात उत्पादन वाढविणे इत्यादीचे मार्गदर्शन कारखान्याचे ऊस विकास विभागामार्फत करण्यात येत आहे.त्याचाच एकभाग म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट ,पुणे येथे दि.२० ते २३ नोव्हेंबर २०२२पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय शिबीरास कारखान्याचे वतीने सदर गटातील महिला ऊस उत्पादकांनापाठविण्यात आले होते. शिबिरासाठी होणारा सर्व खर्च कारखान्याचे वतीने करण्यात आला.
कारखान्याचे धोंडेवाडी येथे उभारलेल्या प्रयोगशाळेत शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेवुन, माती परिक्षण करुन अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भरघोस पिकांचे उत्पन्न घेतलेले आहे. त्याप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही या प्रयोग शाळेमध्ये मार्गदर्शन घेवुन, माती परिक्षण करुन, आपल्या ऊस शेतीमध्ये जास्तीत-जास्त उत्पन्न घ्यावे. असे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांनी सांगितले.
शिबीर व्यशस्वीपणे पार पाडल्याबददल कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी शेती विभागातील कर्मचारी व सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन केले.