मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
मुंबई महराष्ट्रातील अग्रगण्य जॉय ऑफ गिवींग संस्थेच्या वतीने नुकतेच विरार पश्चिम येथील न्यू लाईफ फॉर दी एजेड या वृद्धाश्रमाला भेट देण्यात येऊन या आश्रमासाठी जीवनावश्यक वस्तू (तांदूळ, डाळ, साखर, कोलगेट, हेअर ऑईल, साबण, बिस्कीट,पोहे रवा, गाऊन व पॅन्ट) संचालक राजेश मोरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी आश्रमातील वृद्धांबरोबर गप्पागोष्टी करण्यात येऊन त्यांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न जॉय च्या सभासदांनी केला.वर्षाची सांगता एका चांगल्या उपक्रमाने करण्यात आल्याचे जॉय चे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी नमूद करून या कामासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले व यापुढेही जॉय च्या वतीने अनेक चांगले उपक्रम सुरूच राहणार असल्याचे सांगितले.यावेळी सर्वांना ख्रिसमस व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी जॉय च्या कार्याध्यक्ष असूंता डिसोझा यांनी पुढाकार घेऊन को ऑर्डीनेत केले होते.यावेळी लायन्स क्लब तर्फे आश्रमासाठी दोन नवीन सायकल भेट देण्यात आल्या तर राजभवन ग्रुप तर्फे वृद्धांना नवीन गाऊन पॅन्ट वितरण करण्यात आले.यावेळी जॉय चे अनेक सभासद वेळातवेळ काढून उपस्थित होते.