पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव मधील विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड फाऊंडेशन यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
यश संपादन केलेली विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे इंटरनॅशनलआणि झोनल रँक इयत्ता ३री मधून आरोही पिंगळे,इंटरनॅशनलआणि झोनल रँक २री, वेदिका घडागे,इंटरनॅशनल आणि झोनल रँक २री,ओवी मोरे,इंटरनॅशनल१६ वी आणि झोनल१४ वी रँक,आणि शंभूराजे कुरे इंटरनॅशनल २६वी आणि झोनल रँक ३० वी यांनी असे क्रमांक मिळविले तर या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल सर्टिफिकेट झोनल सुवर्णपदक देण्यात आले.तसेच इयत्ता ४ थी मधून आयुष देशमुख इंटरनॅशनल रँक २१वी झोनल रँक १७ वी मिळवली आहे.अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.